कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत 21 पॉझिटीव्ह, 13 डिस्चार्ज
अकोला दि. 8(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे
(आरटीपीसीआर) 139 अहवाल
प्राप्त झाले. त्यात 12 जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयतून तर खाजगी प्रयोगशाळेतून नऊ
जणांचा असा एकूण 21 जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला. तर 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (शा.वै.म. 12 व खाजगी 9)21+ रॅपिड
ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 21.
आरटीपीसीआर ‘21’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात पाच महिला व सात
पुरुषांचा समावेश आहे. तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण याप्रमाणे: मुर्तिजापूर येथील एक
तर उर्वरित 11 जण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. तसेच नऊ रुग्णाचा अहवाल हा खाजगी लॅब
मधून प्राप्त झाला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
13 जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात 13 रुणांना
डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय रुग्ण ‘124’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65452(49390+15071+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 124 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण असून
त्यातील 11 जण रुग्णालयात दाखल तर अन्य 113
रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
देण्यात आली आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा