कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत 14 पॉझिटीव्ह तर 35 डिस्चार्ज


        अकोला दि.23(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 163 अहवाल प्राप्त झाले. त्यात 13 जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तर खाजगी प्रयोगशाळेतून एक असा एकूण 14 जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला,  तर 35 जणांला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

 

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (शा.वै.म. 13 व खाजगी 1)14+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 14.

आरटीपीसीआर ‘14’

आज दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात सात महिला व सहा पुरुष रुग्णाचा समावेश आहे. हे रुग्ण मुर्तिजापूर येथील दोन, पातूर व बाळापूर येथील प्रत्येकी एक, अकोला ग्रामीण येथील तीन व उर्वरित सहा जण  अकोला मनपा हद्दीतील रहिवासी आहेत, तसेच एक रुग्णाचा अहवाल हा खाजगी लॅब मधून प्राप्त झाला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

35 डिस्चार्ज

आज दिवसभरात 35 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘82’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६५६७९(४९५७४+१५११४+९९१) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८२ सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ