सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांना कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण


अकोला दि.22(जिमाका)-  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने  सर्वसामान्य प्रर्वागातील महिला व युवतींसाठी एक महिना कालावधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी मंगळवार दि.26 रोजी नावनोंदणी करावयाची असून बुधवार दि.27 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित रहावयाचे आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी कळविले आहे.

 या प्रशिक्षणात कापडी पिशव्या, कापडी पर्स, प्रवाशी  पिशव्या, दप्तर, स्कार्प व अनेक प्रकारची उत्पादने बनविण्याचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकांद्वारे  शिकवले जाणार आहे. यासोबतच उद्योजकता विकास, बाजारपेठ कौशल्य, उद्योग व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, शासनाच्या विविध योजनांची माहिती, बँकेची कार्यप्रणाली, संभाषण कौशल्य याबाबत तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येईल.

पात्रता व निकषः-

या प्रशिक्षणासाठी पात्रता किमान 7 वी पास, वय 15 ते 50 वर्ष, तसेच अर्जदार हा अकोला तालुक्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीला कार्यक्रमात नियमित उपस्थिती आवश्यक. प्रशिक्षणासाठी मुलाखतीद्वारे 30 प्रशिक्षणार्थींची निवड केली जाईल. नाव नोंदणीची तारीख मंगळवार दि. 26 जुलै.  कार्यक्रम आयोजिका अश्विनी टिपरे यांच्याकडे नाव नोंदवावे व मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे सत्यप्रत घेऊन दि. 27 जुलै रोजी सकाळी 11 वा. विजय टिपरे यांचा हॉल, देशमुख कॉलनी, गुढधी रोड, अकोला येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीकरीता प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) पहिला माळा एस.पी. ऑफिसच्या बाजूला, जिल्हाधिकारी कार्यालय रोड, अकोला येथे संपर्क साधावा, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी कळविले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ