जि.प. व प.स.निवडणुक; जि.प. उपाध्यक्ष व पंचायत समितीचे उपसभापती पदाच्या निवडीस स्थगित


अकोला, दि.11(जिमाका)- महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास  विभागाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची व सर्व पंचायत समितीमधील उपसभापती पदाची निवडीकरीता आयोजित केलेली विशेष सभा पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.  महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार जिल्ह्यातील सात पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या उर्वरित अडीच वर्षाच्‍या कालावधीकरीता शनिवार दि. 16 जुलै रोजी तर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची निवड दि. 17 जुलै रोजी आयोजित केली होती. या निवडणूका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ