तलावाच्या स्थळी नागरिकांनी जावू नये;मृद व जलसंधारण विभागाचे आवाहन


अकोला दि. 23(जिमाका)-  मागील काही दिवासापासून जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शहर व सभोवतालच्या परिसरातील पर्यटनस्थळी नागरीक व पर्यटन प्रेमीची वरदळ वाढली आहे. अशा ठिकाणी जास्त गर्दी झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.  त्याअनुषंगाने मृद व जलसंधारण विभागाच्या अधिनस्त असलेल्या बोरगांव, सिंसा, उदेगांव , कुंभारी, सुकळी, घोंगा, पिंपळशेंडा, कानडी, भिलखेड, चिचपाणी, धारूर, सावरगांव बु, झ्रंडी, हिवरा, कऱ्ही, पूनौती, वडगांव, पारस, गायगांव, कवळा, कोथळी, आखतवाडा, मोयापाणी, वाघा, धानोरा, पाटेकर, दधम, व हसनापुर इ. येथील  सर्व गाव तलाव, पाझर तलाव, साठवण तलाव, सिंचन तलावाच्या स्थळी पुढील आदेश होईपावेतो प्रवेश निषेध करण्यात आले आहे. अशा स्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न  नागरीकांनी करू नये. आदेशाचे पालन न करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. याची नागरीकांनी नोंद घ्यावी. तसेच नागरिकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करून मृद व जलसंधारण विभागास सहकार्य करावे, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी केले.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ