कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत 22 पॉझिटीव्ह, 13 डिस्चार्ज, एकचा मृत्यू
अकोला दि. 7(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे
(आरटीपीसीआर) 146 अहवाल
प्राप्त झाले. त्यात 16 जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयतून तर खाजगी प्रयोगशाळेतून
सहा जणांचा असा एकूण 22 जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला. तर 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आले. तसेच एकाचा मृत्यूची नोंद झाली, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (शा.वै.म. 16 व खाजगी 6)22+ रॅपिड
ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 22.
आरटीपीसीआर ‘22’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 16 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात आठ महिला व आठ पुरुषांचा
समावेश आहे. तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण याप्रमाणे: तेल्हारा, पातूर, मुर्तिजापूर,
अकोट, बार्शीटाकळी व अकोला ग्रामीण येथील प्रत्येकी एक, बाळापूर येथील दोन तर अकोला महानगरपालिका
क्षेत्रातील आठ जण रहिवासी आहेत. तसेच सहा रुग्णाचा अहवाल हा खाजगी लॅब
मधून प्राप्त झाला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
एकाचा मृत्यू
दरम्यान आज एकाच्या मृत्यूची
नोंद झाली. हा रुग्ण लहान उमरी, अकोला येथील 78 वर्षीय पुरुष
असून या रुग्णास दि. 1 जुलै रोजी दाखल केले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली.
13 जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात 13 रुणांना
डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय रुग्ण ‘116’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65431(49378+15062+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 116 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण असून
त्यातील आठ जण रुग्णालयात दाखल तर अन्य 108
रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा