स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा पुढाकाऱ्यांने वृक्ष लागवड; अकोला-पातुर रस्त्यावर पुन्हा वृक्षवैभव:जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते वृक्ष लागवड

 


अकोला दि.१(जिमाका):- स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय राष्ट्रीय राजमार्ग  प्राधिकरणाने अकोला-पातुर दरम्यान नवनिर्मित महामार्गाच्या दुतर्फा हजारो वृक्ष लागवडीचा कार्यक्रम रविवारी सकाळी  पार पडला.   जिल्हाधिकारी निमा अरोरा, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक राकेश जवादे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले, उपवनासंरक्षक के. अर्जुना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश अपार, एन.सी.सी. चे, कर्नल चंद्रप्रकाश भदोला, मोंटे कार्ले कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सुरेंद्र धिमन, काशिनाथ तिवारी, मनोज यादव, तेजराव थोरात, कापशी सरपंच अंबादास उमाळे, चिखलगाव सरपंच, वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने,पि एस आय हर्षु रत्नपारखी पोलीस उप निरीक्षक मजिद पठाण, सूवर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्प संचालक डॉ सचिन कोकाटे, ऍड मुरलीधर इंगळे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी वृक्ष लागवडी सोबतच संवर्धन ही सुद्धा जबाबदारी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी कर्तव्य जबाबदारी ओळखून त्यासाठी कठोर परिश्रम करावे असे सांगितले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग  प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक राकेश जवादे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने केली जाणारी वृक्ष लागवड पर्यावरण संतुलन कायम करण्यासाठी असून यामुळे प्रदूषणात कमालीची घट होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपूर्ण देशभर राबविला जात आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून चिखलगाव, भंडारज फाटा, लाखनवाडा कापशी दरम्यान रविवारी ३७७५ वृक्ष लागवड करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नाथन, चिखलगाव कापसी राजंदा या ठिकाणच्या शाळेचा शिक्षक वृंद विद्यार्थी तथा नॅशनल कॅडेट कोर चे विद्यार्थी यांचे सह मोंटे कार्ले कंपनीच्या कर्मचारी अधिकारी तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे सुमित देवडा सर्व कर्मचारी अधिकारी यांचे सहकार्य लाभले.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ