राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा जिल्हा दौरा
अकोला, दि.६ (जिमाका)- राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गुरुवार दि.७ रोजी जिल्हा
दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि.७ रोजी दुपारी बारा वा. अकोला
विमानतळ येथे विमानाने आगमन व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला कडे
प्रयाण, दुपारी साडे बारा वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या
दीक्षांत समारंभास उपस्थिती, स्थळः दीक्षांत सभागृह,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी
विद्यापीठ, अकोला. दुपारी दोन ते सव्वा
तीन वा. राखीव, सव्वा तीन वा. शेगाव जि.
बुलडाणाकडे रवाना, दुपारी चार वा. संत गजानन महाराज मंदीर, शेगाव येथे भेट व
दर्शन, सायं. साडे चार वा. अकोला विमानतळाकडे परतीचा प्रवास, सायं. साडेपाच वा.
विमानाने नागपूरकडे रवाना.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा