महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे महिलांसाठी फॅशन डिझाईन प्रशिक्षण; दि.२१ पर्यंत नाव नोंदणीचे आवाहन

  अकोला दि. 19(जिमाका)- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) अकोला तर्फे सामान्य प्रवर्गाकरीता (GEN) मधील युवती व महिलांसाठी फॅशन डिझायनिंचे एक महिना कालावधीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

            या प्रशिक्षणात फॅशन डिझायनिंग संबंधितमहिलांचे विविध वस्त्र प्रावरणांमधील आधुनिक फॅशनबाबत प्रात्यक्षिकासहित प्रशिक्षण दिले जाणार आहे.  तसेच उद्योजकता विकास, बाजारपेठ कौशल्य, उद्योग व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, शासनाच्या विविध योजनांची माहिती, बँकेची कार्यप्रणाली, संभाषण कौशल्य याबाबत मार्गदर्शन देण्यात येईल. तसेच प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येईल.

प्रशिक्षणासाठी किमान पात्रताः- 7 वी उत्तीर्ण, वयोमर्यादा १५ ते ५० वर्ष, जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक. प्रशिक्षणाला नियमित हजेरी आवश्यक.

या प्रशिक्षणासाठी मुलाखतीद्वारे ३० प्रशिक्षणार्थिंची निवड केली जाईल. त्यासाठी दि. २१ जुलै पर्यंत वृषाली काळणे मो. नं. ९३७३९९६०१ यांच्याकडे नाव नोंदणी करावी तसेच मुलाखतीसाठी मुळ कागद पत्रे घेऊन दि. २२ जुलै  रोजी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), पहिला माळा, एस. पी. ऑफिसच्या बाजूला, जिल्हाधिकारी कार्यालय रोड, अकोला येथे सकाळी ११ वाजता हजर रहावे. अधिक माहिती करीता प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्‍नपारखी यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ