पत्रकार; माध्यमकर्मींसाठी आज (दि.23) कोविड लसीकरणाचे विशेष सत्र; लाभ घेण्याचे आवाहन

 

अकोला दि.22(जिमाका)- जिल्ह्यातील पत्रकार व माध्यमकर्मींसाठी कोविड लसीकरणाचे शनिवार दि.२३ रोजी विशेष सत्राचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात करण्यात आले असून या शिबिरात पत्रकार, माध्यमकर्मी व त्यांचे कुटुंबिय यांना लसीकरण करुन घेता येईल, या संधीचा लाभ अधिकाधिक पत्रकारांनी व माध्यमकर्मींनी घ्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे. या उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला व एम. आरआयटीई प्रकल्पासाठी वायजीआर केअर यांच्या समन्वयातून करण्यात आले आहे.

कोविड लसीकरणासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्यात पत्रकार, त्यांचे कार्यालयीन सहकारी व कुटुंबीय यांचे कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. शनिवार दि.२३ रोजी सकाळी १० वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात  हे विशेष सत्र लसीकरण आयोजित करण्यात येईल, त्यात सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी येतांना आधार कार्ड व मोबाईल फोन आणावा. तसेच पोटभर नाश्ता करुन यावे, अशी सुचनाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम