कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत 19 पॉझिटीव्ह, 14 डिस्चार्ज


 अकोला दि. 5(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 172 अहवाल प्राप्त झाले. त्यात 14 जणांचा तर खाजगी प्रयोगशाळेतून पाच जणांचा असा एकूण 19 जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला, तसेच 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (शा.वै.म. 14 व खाजगी 5)19+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 19.

आरटीपीसीआर ‘19

आज दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 14 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात सहा महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. तालुकानिहाय  रुग्ण याप्रमाणे: बार्शीटाकळी येथील दोन, मुर्तिजापूर येथील दोन, बाळापूर येथील एक, पातूर येथील एक, अकोला ग्रामीण येथील दोन तर सहा रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. तर पाच रुग्णाचा अहवाल हा खाजगी लॅब मधून प्राप्त झाला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

14 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात 14 रुणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘102’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65393(49349+15053+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 102 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण असून त्यातील 12 जण रुग्णालयात दाखल तर अन्य 90 रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत,  अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन