दीनदयाल स्पर्श योजना; शिष्यवृत्तीकरीता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले
अकोला दि.28(जिमाका)- दीनदयाल स्पर्श योजनेअंतर्गत डाक विभागाव्दारे इयता सहावी ते नववी वर्गातील
विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या योजनेव्दारे विद्यार्थ्यांमध्ये
डाक तिकीट संग्रहणाचे छंद, त्यांच्या योग्यता व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी फिलाटेली
प्रतियोगिता घेतली जाते. या प्रतियोगितेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 31
ऑगस्टपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन डाक विभागाचे अधीक्षक यांनी केले आहे.
महाराष्ट्र आणि गोवा पोस्टल सर्कलमधील 40 विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी
सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी
फिलाटेल डिपॉझिट ॲकाऊंट काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी
होण्यासाठी दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावा. तसेच फिलाटेली आधारित लेखी परीक्षा
दि. 15 सप्टेंबर रोजी क्षेत्रीय कार्यालयात घेण्यात येईल. प्रतियोगितेचा निकाल दि.
10 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. क्षेत्रीय स्तरावरील लेखी परीक्षेत पात्र झालेल्या
विद्यार्थ्यांनी फिलाटेल प्रोजेक्ट दि. 25 ऑक्टोंबरपर्यंत सर्कल कार्यालय, मुंबई
येथे सादर करावा. अंतिम निकाल 29 नोव्हेंबर रोजी तर शिष्यवृत्ती वितरण 31 डिसेंबर 2022 रोजी होईल,
अशी माहिती डाक विभागातर्फे देण्यात आली आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा