कारंजा प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने विसर्ग; सावधानतेचा इशारा

 


           अकोला,दि.१४(जिमाका)- बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजापूर येथील कारंजा प्रकल्पातून आज सकाळी ११ वाजेपासून पूर्ण क्षमतेने विसर्ग करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता कारंजा प्रकल्प यांनी कळविले आहे. त्यामुळे प्रवाहित पाण्याच्या मार्गाच्या काठावरील गावांतील ग्रामस्थांनी सावध रहावे. तसेच या पुरामुळे कारंजा- हातरुण हा रस्ता बंद पडू शकतो, असेही सुचित करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी नदी, नाले, तलाव, बंधारे येथे पोहण्याचे वा पुरस्थितीतून बाहेर पडण्याचे धाडस करु नये. रस्त्यावरुन वा पुलावरुन पाणी वाहत असल्यास रस्ता वा पूल ओलांडू नये. या कालावधीत सर्व यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी,असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन