नोंदणी व मुद्रांक विभाग; शास्तीच्या रक्कमांवर सवलत


अकोला दि.26(जिमाका)- मुद्रांक शुल्‍काच्‍या तुटीच्‍या भागावरील शास्‍तीची कपात करण्‍याकरीता महाराष्‍ट्र मुद्रांक अधिनियमातील विविध कलमातील तरतुदीनुसार मुद्रांक जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्‍या प्रकरणांमधील दि. 31 मार्चपूर्वी नोटीस मिळाली आहे अशा पक्षकारानी 31 जुलैपर्यंत  मुद्राक शुल्क दंड सवलत योजनेचा जास्‍तीत जास्‍त नागरीकांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन मुद्रांक महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

योजनेतील अर्ज दाखल करण्‍याची मुदत दि. 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2022 असेल. दि. 1 एप्रिल ते 31 जुलै  2022  या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास दंडाच्या रकमेत 90 टक्‍के सुट राहील, दि. 1 ऑगस्ट ते  30 नोव्हेंबर 2022 या कालावधीसाठी मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास दंडाच्या रकमेत 50 टक्‍के सुट राहील. योजनेबाबत अधिक माहिती नोंदणी मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहे. याबाबत कोणतेही अडचण असल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाचे कॉल सेंटर 8888007777 व ईमेल आयडी complaint[at]igrmaharashtra[dot]gov[dot]in यावर संपर्क साधावा, असे मुद्राक व नोंदणी विभागाव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ