दिव्यांगांसाठी पुरस्कार; अर्ज मागविले

 अकोला दि.२५(जिमाका)- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन  सशक्तिकरणाच्या विभागातर्फे दिव्यांग व्यक्ति व दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना  सन २०२१ व २०२२ या वर्षासाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांनी केंद्रशासनाने तयार केलेल्या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. हे अर्ज दि. २८ ऑगस्ट २०२२ पर्यंत भरता येणार आहेत, तरी इच्छुक व्यक्ती व संस्थांनी आपापले अर्ज भरावे,असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.एम.पुंड यांनी केले आहे.

अधिक माहितीः- इच्छुक व्यक्ती व संस्थांनी आपापले अर्ज  हे www.awards/gov.in या संकेतस्थळावरुन भरावे. दि.२८ ऑगस्ट २०२२ पूर्वी प्राप्त अर्ज विचारत घेतले जातील.  ऑनलाईन अर्ज  पासवर्ड संरक्षित करुन  सादर करावे. सर्व मुद्यांची माहिती, उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याच्या सविस्तर वर्णनासह भरावी. समक्ष अथवा पोस्टाद्वारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. पात्रता निकष व अन्य सविस्तर तपशिल  www.disabilityaffairs.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध  दिव्यांग सक्षमीकरण राष्ट्रीय मार्गदर्शक सुचनांनुसार विचारात घेण्यात येतील. जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती व संस्थांनी ऑनलाईन अर्ज दिलेल्या मुदतीत सादर करावे,असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी डी.एम. पुंड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ