शिष्यवृत्ती परीक्षा आता दि.31 रोजी


अकोला दि.१५(जिमाका):- पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृती परीक्षा  बुधवार दि.२० रोजी आयोजित करण्यात आली होती. राज्यातील अनेक जिल्ह्यात उद्भवलेल्या अतिवृष्टीमुळे वाहतुक बंद आहे. त्यामुळे दि.२० रोजी होणारी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आता ही परीक्षा रविवार दि.३१ जुलै रोजी होईल. त्यासाठी यापूर्वी निर्गमित केलेले प्रवेश पत्र ग्राह्य धरण्यात येईल, असे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. वैशाली ठग यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ