मागासवर्गीय मुलींसाठी शासकीय वसतीगृह मुर्तिजापूर येथे मोफत प्रवेश

 अकोला दि.19(जिमाका)- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालविण्यात येणारे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, मर्तिजापूर येथे मागासवर्गीय मुलींना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशासाठी इयत्ता 8 ते पदवी पर्यंतचे परीक्षेस  प्रवेशित विद्यार्थिनी पात्र आहेत. या वसतीगृहात प्रवेशितांना मोफत भोजन, निवास व्यवस्था, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, व स्वच्छता भत्ता दिला जातो. इच्छुक गरजू मुलींनी किंवा पालकांनी गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, मुर्तीजापूर येथे दि.30 जुलै पर्यंत प्रवेश पत्र भरून द्यावे. प्रवेश प्रक्रिया जिल्हास्तरावरून केली जाते. उशिरा प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे गृहपाल यांनी कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ