शासकीय बालगृहात आरोग्य विषयक मार्गदर्शन




        अकोला दि. 6(जिमाका)- प्राथमीक आरोग्य केंद्र कापशी व जिल्हा जिल्हा बाल संरक्षण कक्ष अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय बालगृहात आरोग्य विषयक शिबीर बुधवारी (दि.6) पार पडले. या शिबीरामध्ये आरोग्य विभागाव्दारे  किशोरवयीन मुलींच्या समस्या, हातधुण्याच्या विविध पद्धती, ओ.आर.एस. कसे तयार करावे, वैयक्तीक स्वच्छता अशा विविध आरोग्य विषयक मार्गदर्शन केले, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.

पावसाळ्यात बालकांमध्ये विविध साथींचे आजार पसरुन अतिसाराची लागण होण्याची शक्यता असते. आरोग्य विभागांमार्फत 1 ते 15 जुलै या कालावधीत अतिसार पंधरवाडा राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने  गायत्री बालिकाश्रम, शासकीय बालगृह व सुर्यादय बालगृहातील बालकांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा लसीकरण समन्वय डॉ. मनिष शर्मा व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये डॉ. मनिषा वाघमारे यांनी वैयक्तीक स्वच्छता व किशोरवयीन मुलींच्या समस्यांबाबत खेळी मेळीच्या वातावरणात मार्गदर्शन करुन बालिकांच्या समस्यांचे निरसन केले. अधिपरीचारीका कल्पना नाईक यांनी गीताच्या  माध्यमातुन हात कसे धुवावे यांची माहीती दिली व प्रवेशीतांनी सुध्दा त्यांच्या मागोमाग गीत गायन केले. मंगला खंडारे, निलेश पवार व ज्योती समदुरे यांनी ओ.आर.एस कसे तयार करावे आणि त्यांचे सेवण कसे करावे या बाबत माहीती देवून  ओ.आर.एस. चे पाकीटे तथा झींक च्या गोळया देण्यात आल्या.  सर्व बालगृहांमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, रेवत खाडे, शासकीय बालगृहांचे अधिक्षक जयश्री वाढे, गायत्री बालिकाश्रमाच्या वैशाली भारसाकळे, उत्कर्ष शिशुगृहांचे प्रिती दांदळे, सुर्यादय बालगृहांचे शिवराज पाटील व प्रशांत देशमुख यांनी परिश्रम घेतले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन