महसूल विभागातील 61 फ्रंट लाईन वर्कर्सने घेतला प्रिकॉशन डोस



            अकोला दि. 8(जिमाका)- महसूल विभाग व महानगरपालिका यांच्या विद्यमाने महसूल विभागातील फ्रंट लाईन वर्कर्स करिता प्रिकॉशन लसीकरण डोस सत्राचे आयोजन लोकशाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला येथे आज करण्यात आले. या शिबीरामध्ये 61 लाभार्थ्यांनी तिसरा डोस व 64 लाभार्थ्यांनी आपला दुसरा डोस घेतला, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.मनिष शर्मा यांनी दिली.  लसीकरण सत्राचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले. यावेळी महानगरपालिका कोविड लसीकरण अधिकारी डॉ. अनुप चौधरी, आर.सी.एच. अधिकारी डॉ. विजय चव्हाण व वैद्यकीय अधिकारी डॉ. गुल्हाने उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन