जिल्हा कृतीदल बैठक कोविड लसीकरण सत्रांचे गावनिहाय नियोजन करा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

 





अकोला दि.१८(जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वय वर्षे १८ ते ५९ या वयोगटातील लाभार्थ्यांना बुस्टर डोसचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. ह्या व नियमित लसीकरणाचे गावनिहाय नियोजन करुन  येत्या ७५ दिवसांत लसीकरण मोहिम व्यापकतेने राबवा,असे निर्देश जिल्हाधिकार निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

 जिल्हा कृतीदलाच्या बैठकीचे आयोजन  आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. या बैठकीस आरोग्य उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) डॉ. सुचिता पाटेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ. वैशाली ठग,  डॉ. मनिष शर्मा, डॉ. अनुप चौधरी, तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे,  लसीकरण व बुस्टर डोस बाबत जनजागृती करणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण सत्रांचे आयोजन शाळांमध्ये करावे. तसेच सर्व आस्थापनांमध्येही सत्र आयोजित करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी अरोरा यांनी यावेळी दिले.

या बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात एकूण (तिन्ही डोस मिळून) १५ लक्ष ८९ हजार ४४० लसीकरण होणे अपेक्षित आहे. तथापि, पहिला डोस आतापर्यंत १२ लक्ष २४ हजार ४१७ (७७ टक्के), दुसरा डोस ८ लक्ष ५३ हजार ७३५ (५४ टक्के) तर तिसरा डोस (बुस्टर) २७ हजार १५९ जणांना देण्यात आला आहे.  तिसऱ्या डोस मध्ये  आता नव्याने १८ ते ५९ वयोगटाचा समावेश झाला आहे. जिल्ह्यात सध्या  १२ हजार कोव्हिशिल्ड, १५ हजार कोव्हॅक्सिन, ५५ हजार कोर्बोव्हॅक्स (१२ ते १४ वर्षे वयोगटासाठी)  डोस  उपलब्ध आहेत, अशी माहिती डॉ. मनिष शर्मा यांनी दिली.

लसींच्या उपलब्धतेनुसार लसींचे डोसची मागणी नोंदविणे, प्रत्येक गावात लसीकरण आयोजित करणे, महापालिका क्षेत्रातही लसीकरण सत्र आयोजित करावे. लसीकरण सत्रांच्या आयोजनांची माहिती विविध माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवावी,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ