कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत 16 पॉझिटीव्ह, 10 डिस्चार्ज
अकोला दि. 6(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे
(आरटीपीसीआर) 129 अहवाल
प्राप्त झाले. त्यात 13 जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयतून तर खाजगी प्रयोगशाळेतून तीन
जणांचा असा एकूण 16 जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला, तसेच 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (शा.वै.म. 13 व खाजगी 3)16+ रॅपिड
ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 16.
आरटीपीसीआर ‘16’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात नऊ महिला व चार पुरुषांचा
समावेश आहे. तालुकानिहाय रुग्ण याप्रमाणे:
बाळापूर व पातूर येथील प्रत्येकी एक, उर्वरित 11 जण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील
रहिवासी आहेत. तसेच तीन रुग्णाचा अहवाल हा खाजगी लॅब
मधून प्राप्त झाला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
10 जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात 10 रुणांना
डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय रुग्ण ‘108’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65409(49362+15056+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 108 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण असून
त्यातील 11 जण रुग्णालयात दाखल तर अन्य 97 रुग्ण हे गृह अलगीकरणात
आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा