मुर्तिजापूर येथे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना डी.टी.पी. प्रशिक्षण


अकोला दि.22(जिमाका)-  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुर्तीजापूर येथे अनुसूचित जातीच्या युवक युवतीना डी.टी.पी. चे एका महिन्याचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले आहे. त्यामध्ये पेंट ब्रश, एक्सेल, पेज मेकर व अनेक प्रात्यक्षिके शिकवले जाणार आहे.  त्यासाठी इच्छुकांनी दि. 25 पर्यंत नावनोंदणी करावयाची आहे तर दि.26 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी केले आहे.

या प्रशिक्षणात डी.टी.पी. सोबत उद्योजकता विकास, बाजारपेठ कौशल्य, उद्योग व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, शासनाच्या विविध योजनांची माहिती, बँकेची कार्यप्रणाली, संभाषणकौशल्य याबाबत तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे सविस्तर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

पात्रता व निकषः-

प्रशिक्षणासाठी पात्रता किमान ७ वी पास, वय १५ ते ५० वर्ष, तसेच अर्जदार हा अनुसूचित  जातीचा व मुर्तिजापूर येथील रहिवासी असावा. प्रशिक्षण कार्यक्रमात नियमित हजर राहणे आवश्यक. प्रशिक्षणासाठी मुलाखतीद्वारे ३७ प्रशिक्षणार्थींची निवड केली जाईल. नाव नोंदणी दि. २५ जुलै रोजी करावयाची असून आपली नावे कार्यक्रम आयोजक ओशो बनसोड(मो. ९८५०३२४६५४) यांच्याकडे नाव नोंदवावे. मुलाखतीसाठी आवश्यक मुळ कागदपत्र घेऊन मंगळवार दि. २६ जुलै रोजी सहारा कॉम्पुटर, कारंजा बायपास, मुर्तिजापूर येथे सकाळी ११ वाजता उपस्थित रहावे. अधिक माहितीकरीता प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पहिला माळा एस. पी. ऑफिसच्या बाजूला, जिल्हाधिकारी कार्यालय रोड, अकोला येथे संपर्क साधावा, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ