"जागतिक युवा कौशल्य दिन" दिनानिमित्त प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन

 अकोला दि.१५(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.१५) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे "जागतिक युवा कौशल्य दिन" साजरा करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.   

  प्राचार्य पी.एन.जयस्वाल यांनी विविध योजनांबरोबरच महाराष्ट्रातल्या आय.टी.आय.मध्ये संशोधन व नवीन अभिनव संकल्पना विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या संकल्पनेतूनच स्टार्टअप संस्कृती विकसित होईल, असे प्रतिपादन केले. राहुल इंगळे यांनी नवीन संकल्पना अभिनव प्रयोग यांना चालना देण्यासाठी विविध टप्प्यांवरील मार्गदर्शन व होणारी मदत तसेच शासकीय मदत ते पेटंट पर्यंतचा प्रवास प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन  करताना विशद केले. तर जिल्हा कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त द.ल.ठाकरे यांनी श्रमआधारित उत्पन्नाचा मुख्य आधार कौशल्य तथा जागतिक युवा कौशल्य दिनाचे प्रास्ताविक व कौशल्यांचे महत्त्व विशद केले. तसेच प्रशिर्थ्यांनी स्टार्टअप संस्कृती विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा प्राचार्य  पी.एन. जयस्वाल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पातुरचे  कनिष्ठ सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार तथा प्राचार्य एस.बी.घोंगडे,  गटनिदेशक मंगेश पुंडकर, आर.पी. टेक्नो. फर्टीलायझर्स. प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राहुल इंगळे, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे आर.टी.मगर व संदीप पिसे तसेच सर्व शिल्पनिदेशक, कर्मचारी व प्रशिक्षणार्थ यांनी परिश्रम घेतले. तर संस्थेचे गटनिदेशक कौशलाचार्य मंगेश पुंडकर यांनी आभार प्रदर्शन केले.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ