कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत सात पॉझिटीव्ह,13 डिस्चार्ज तर एकाचा मृत्यू


        अकोला दि.28(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 138 अहवाल प्राप्त झाले. त्यात पाच जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तर खाजगी प्रयोगशाळेतून दोन असा एकूण सात जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला, तर 13 जणांला डिस्चार्ज देण्यात आले. तसेच एकाचा मृत्यूची नोंद झाली, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 5 व खाजगी 2)7+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य =एकूण पॉझिटीव्ह 7.

आरटीपीसीआर ‘सात’

आज दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष व तीन महिलेचा समावेश असून हे रुग्ण बाळापूर, मुर्तिजापूर, पातूर, अकोला ग्रामीण व अकोला मनपा हद्दीतील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत. तसेच दोन रुग्णाचा अहवाल हा खाजगी लॅब मधून प्राप्त झाला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

13 डिस्चार्ज

आज दिवसभरात 13 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज अकोला महानगरपालिका हद्दीतील 70 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारा दरम्यान दि. 28 जुलै रोजी मृत्यू झाला. या रुग्णाला दि. 26 जुलै रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

                                                              सक्रिय रुग्ण ‘89

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६५७१८(४९६०९+१५११८+९९१) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८९ सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ