बालगृहातील बालकांची आधार नोंदणी

 




               अकोला दि. 20(जिमाका)-  महिला व बालविकास विभागाअंतर्गत बालगृह व शिशुगृहातील बालकांचे मंगळवारी (दि.19) गायत्री बालीकाश्रम, मलकापुर येथे आधार कार्ड नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये नवीन प्रवेशीतांची आधार कार्ड नोंदणी व नोंदणीकृत आधार कार्ड अपडेट करण्यात आले, अशी माहिती  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.

 

बालगृहांतील बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा. तसेच त्यांच्या ओळखीचा आणि रहिवाशी असल्याचा पुरावा म्हणुन आधार कार्ड हे आवश्यक आहे. या सुविधेपासून बालगृहातील बालके वंचीत राहु नये या करीता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आधार कार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद ठाकुर यांच्या सहकार्याने बालगृहातील नवीन प्रवेशीत असलेले बालकांचे आधार कार्डचीनोंदणी व ज्यांचे आधार कार्ड आहे त्यामध्ये अपडेट करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, सचिन घाटे, योगेश गावंडे, गायत्री बालिकाश्रमाच्या वैशाली भारसाकळे, सुर्यादय बालगृहाचे शिवराज खंडाळकर, शासकीय बालगृहांचे जयश्री वाढे यांनी परिश्रम घेतले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ