आकाश सातरोटे यांची सिनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरीता निवड


    अकोला दि.२१(जिमाका)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील जिल्हा कबड्डी प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी आकाश सातरोटे यांची 69 वी सिनीयर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरीता विदर्भ पुरुष कबड्डी संघात निवड झाली आहे.  ही स्पर्धा चरकी दादरी (रोहतक हरीयाणा) येथे दि. 21 ते 24 जुलै या कालावधीत होणार आहे. आकाश सातरोटे याने अमरावती विद्यापीठ संघाचे चार वेळा प्रतिनिधीत्व केले असून तो जिल्हा कबड्डी प्रशिक्षण केंद्राचा नियमित खेळाडू आहे. राष्ट्रीय मार्गदर्शक विजय खोकले व जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी मार्गदर्शक अरूण जितेंद्रसिंह ठाकूर, सचिव अशोकराव देशमुख, उपाध्यक्ष सतिश डफले, अकोला जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष क्रीडा राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे, सचिव वासूदेवजी नेरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी, संग्राम गावंडे, मंगलसिंग ठाकूर, प्रभाकराव रुमाले, साहेबराव वानखडे, संजय मैद, रामभाऊ दहापुते, शंकर जावळे इ. मान्यवरांनी आकाश सातरोटे याला पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.

 

0000000 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ