डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज (दि.७) दीक्षांत समारंभ: ३,६४६ जणांना पदवी, ना.गडकरींचा मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ने सन्मान
अकोला, दि.६ (जिमाका)- येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३६ वा दीक्षांत समारंभ गुरुवार दि.७ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावर्षी विद्यापीठातर्फे ३६४६ विद्यार्थ्यांना (स्नातक, स्नातकोत्तर व आचार्य) विविध पदव्या दिल्या जातील. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षस्थानी होणाऱ्या या समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या पदवीने सन्मानित केले जाणार आहे,अशी माहिती कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. पंजाबराव देशमुख
कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत समारंभाची माहिती देण्यासाठी शेतकरी भवनाच्या
सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेस कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्यासह कुलसचिव डॉ.
सुरेंद्र काळबांडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेंद्र गाडे, डॉ. किशोर बिडवे हे
उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. भाले
यांनी माहिती दिली की, या सोहळ्यास राज्यपाल तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी
विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहे. केंद्रीय
रस्ते वाहतुक आणि परिवहन मंत्री नितीन
गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत; त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद
पदवीही प्रदान केली जाणार आहे. तसेच पंडीत दीनदयाल उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान
विश्वविद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे माजी कुलगुरु डॉ. एम.
एल. मदान यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
डॉ. भाले पुढे
म्हणाले की, या सोहळ्यात ३४६४ स्नातकांना निरनिराळ्या पदव्या प्रदान केल्या जाणार
आहेत. त्यात स्नातक पदव्या ३२३४ असून ३८१ पदव्युत्तर तर ३१ आचार्य पीएचडी पदव्यांचे प्रदान होणार
आहे. या शिवायही इतर महत्त्वाची पदके, पारितोषिके वितरीत होणार आहे, अशी माहिती
यावेळी देण्यात आली.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा