हवामान अंदाजःविजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता


अकोला,दि.१३(जिमाका)- भारतीय हवामान विभाग यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ७६ ते १०० मि.मी इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 पुरापासून बचावासाठी नागरिकांनी खालील प्रमाणे काळजी घ्यावी.

या कालावधीत नदी नाला काठावरील गावांना व शहरी भागातील सखल भागातील वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी, नाले, तलाव, बंधारे येथे जलसाठा जमा होत असल्याने त्यामध्ये पोहण्यास जाऊ नये. रस्त्यावरून, पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहने नेण्याबाबत दक्षता घ्यावी. तसेच स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी,असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ