निंभा येथील ईवर्ग जमीनीवरील अतिक्रम काढले; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अतिक्रमण जमिनीवर वृक्षारोपण


अकोला दि.29(जिमाका)-   मुर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपपंचायत निंभा येथील ईवर्ग जमिनीवर कास्तकारांनी 70 एकर जमिनी अतिक्रमण केले होते.  अतिक्रमण जमीन हटवून वृक्षरोपण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने आज पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले. शासकीय जमिनीवर अतिक्रमण होणार नाही यांची दक्षता ग्रामपंचायतीने घ्यावी, असे निर्देश निंभा ग्रामपंचायत भेट दरम्यान जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते अतिक्रमण जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आले.

पविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व  तहसिलदार प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली. यावेळी मुर्तिजापूरचे नायब तहसिलदार उमेश बनसोड,सहायक गटविकास अधिकारी चंद्रशेखर वंजारी, विस्तार अधिकारी विजय किर्तने, निंभा ग्रामपंचायतीचे सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल आदि उपस्थित होते.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ