कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत दोन पॉझिटीव्ह तर तिघांना डिस्चार्ज

   अकोला दि.१८(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ३५अहवाल प्राप्त झाले. त्यात दोन जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आरटीपीसीआरअहवाल पॉझिटीव्ह आला,  तर तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

 

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (शा.वै.म. २ व खाजगी ०)२+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह २.

आरटीपीसीआर ‘दोन’

आज दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे. हे दोघेही रुग्ण अकोला मनपा हद्दीतील रहिवासी आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

तीन जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात तिघा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘१४३’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६५६०९(४९५१६+१५१०२+९९१) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४३ सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण असून त्यातील २५ जण रुग्णालयात दाखल तर अन्य ११८ रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ