आयटीआय मध्ये ‘हार्वेस्टर’ प्रशिक्षण..!

 





अकोला दि.२५(जिमाका)-येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रतनलाल प्लॉट, अकोला येथे विद्यार्थ्यांना हार्वेस्टर ऑपरेटींग व दुरुस्तीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. कृषी आधारीत स्वयंरोजगाराच्या संधीच्या दृष्टिने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. क्लास एग्रीकल्चर मशिनरी प्रा.लि.जर्मनी.या कंपनीतर्फे हार्वेस्टर प्रशिक्षण देण्यात आले. कंपनीचे तज्ज्ञ व्यक्ती आनंद पानसे यांनी कम्बाईन हार्वेस्टर ची माहिती व प्रशिक्षण दिले. ग्रामीण भागात शेती पूरक व्यवसाय करण्याची संधी छोट्या आकाराचे व क्षमतेच्या हर्वेस्टरमुळे निर्माण झाली आहे. मेकॅनिक मोटर व्हेईकल व डिझेल मेकॅनिक या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. स्वयंरोजगाराच्या  संधी निर्माण करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण आयोजनासाठी संस्थेतील शिल्पनिदेशक पी.एम.चिकटे, डी एम नागपुरे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ