एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश; दि.५ ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविले

 अकोला दि. 18(जिमाका)- प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला, अंतर्गत अकोला जिल्ह्यात एकूण सहा आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह आहेत. इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी या वसतीगृहात प्रवेश दिला जातो. त्यासाठी  सोमवार दि.१८ ते  शुक्रवार दि.५ ऑगस्ट या दरम्यान अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रवेशासाठी Swayam.mahaonline.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा असल्याचे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र.01 कृषीनगर अकोला, आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र. 02 किर्ती नगर अकोला, आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह क्र. 01 तोष्णीवाल ले-आउट पाण्याच्या टाकीजवळ अकोला, आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह क्र. 02 दीपक चौक, दामले मार्केट रामदास पेठ, पो.स्टे. रोड अकोला, (इ.10 वी व 12 वी च्या पुढील अभ्यासक्रमाकरीता) तर आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह मुर्तिजापूर (सिरसो गायरान) ता.मुर्तिजापूर जि.अकोला, आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह मनतकार पेट्रोल पंपाजवळ तेल्हारा, ता. तेल्हारा, जि. अकोला. (इ. 7 वी, 10 वी व 12 वी च्या पुढील अभ्यासक्रमाकरीता) प्रवेश सुविधा उपलब्ध आहेत.

प्रवेशासाठी आवश्यक बाबी: विद्यार्थी / विद्यार्थिनी हे अनुसूचित जमातीचे असावे, विद्यार्थ्यांकडे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्र, तहसिलदार यांचा चालू वर्षातील उत्पन्नाचा मुळ दाखला, विद्यार्थ्याचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बँकेत व आधार कार्ड; मोबाईलशी (लिंक) संलग्न खाते, विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरात विद्यार्थ्यांचे पालक रहिवासी नसावेत. मान्यताप्राप्त महाविद्यालय व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा, आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन अर्ज बंधनकारक. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्याचे संस्थेच्या वसतीगृहामध्ये प्रवेश घेतला नसल्याचे प्रमाणपत्र. प्रवेश घेतलेल्या शाळा / महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, कुटुंबप्रमुखाचे हमीपत्र,  शाळा / कॉलेज सोडल्याचा दाखला (टि.सी.), मार्कशिट,  विद्यार्थ्याचा फोटो, आधारकार्ड, आई/वडील नोकरीवर नसल्याचे प्रमाणपत्र ओरीजनल (ग्रामसेवक/तलाठी यांचे), ऑनलाईन भरलेला फॉर्म ऑफलाईन काढून प्रत व ऑनलाईन सादर केलेले आवश्यक दस्ताऐवज संबधीत वसतीगृहाच्या गृहपालांकडे सादर करणे आवश्यक राहील, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ