इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी वेळापत्रक जाहीर

 अकोला दि.१९(जिमाका)- इयत्ता ११ वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून  प्रवेश प्रक्रिया या कनिष्ठ महाविद्यालयस्तरावरच होणार आहेत. त्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया पार पाडावी असे निर्देश जिल्हाशिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ. सुचिता पाटेकर यांनी दिले आहेत. इयत्ता ११ वी प्रवेशासाठी प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली असून  त्याअधीन राहूनच प्रवेश द्यावेत. सीबीएसई व आयसीएसई साठीही  जागा रिक्त ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. प्रवेशाबाबत काही अडचणी आल्यास जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयातील उच्च माध्यमिक शिक्षण विभागात  संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेळापत्रक याप्रमाणे-

 दि.२० रोजी प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांची एकत्रित गुणवत्ता यादी व  गुणवत्ता, विहित आरक्षण , संवर्गनिहाय यादी करुन सुचना फलकावर लावणे, दि.२० ते २३ प्रवेश यादीनुसार प्रवेश देणे, दि.२५ रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादी लावणे, दि.२६ ते २७ प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, दि.२८ ला दुसरी प्रतीक्षा यादी लावणे,  दि.२९ दुसऱ्या प्रतीक्षा यादी प्रमाणे प्रवेश देणे,  दि.३० तिसरी प्रतीक्षा यादी लावणे, दि.१ ऑगस्ट  तिसऱ्या प्रतीक्षायादीनुसार प्रवेश देणे,  दि.२ ऑगस्ट रोजी संबंधित प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी प्रवेशाबाबतच अहवाल सादर करणे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ