कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत 18 पॉझिटीव्ह तर 11 डिस्चार्ज
अकोला दि.10(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 138 अहवाल प्राप्त झाले. त्यात १८ जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयतून आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला. तर 11 जणांला डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (शा.वै.म. 18 व खाजगी 0 )18+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य =
एकूण पॉझिटीव्ह 18.
आरटीपीसीआर ‘18’
आज दिवसभरात आरटीपीसीआर
चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 18 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात आठ महिला व दहा
पुरुष रुग्णाचा समावेश आहे. तालुकानिहाय
पॉझिटिव्ह रुग्ण याप्रमाणे: पातूर येथे एक, बार्शीटाकळी येथे एक, मुर्तिजापूर व अकोट
येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित 12 जण अकोला महानगरपालिका
क्षेत्रातील रहिवासी आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
11 जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात 11 रुणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय रुग्ण ‘130’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65478(49512+15075+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 130 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण असून त्यातील नऊ जण रुग्णालयात दाखल तर अन्य 121 रुग्ण हे
गृह अलगीकरणात आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात
आली आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा