दिव्यांग कल्याण कृती आराखडा; दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 




 अकोला, दि.3(जिमाका)- जिल्ह्यातील दिव्यांगाच्या कल्याणासाठी कृती आराखडा तयार करुन दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासाकरीता सर्व विभागांनी प्रयत्न करावे. दिव्यांगाच्या समस्यांच्या निराकरणासाठी क्रीडा स्पर्धा, रोजगार मेळावे, युआयडी कार्ड वाटप अशा उपक्रमाव्दारे प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात दिव्यांगाच्या कल्याणासाठी कृती आराखडाबाबात आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वारे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जि.प. समाज कल्याण अधिकारी डि.एम.पुंड, महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे,  .प. प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे, तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आढावा बैठकीत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, बालकांमध्ये दिव्यांगत्व येवू नये याकरीता गर्भधारण पूर्व व नंतर दिव्यांगासंबंधी दिसणारे लक्षणानुसार उपाययोजना राबवून गर्भवती मातांना मार्गदर्शन करावे. दिव्यांगाना सर्व क्षेत्रात संधी निर्माण व्हावे याकरीता त्यांच्या पात्रतेनुसार प्रशिक्षीत करुन रोजगार मेळाव्याचे आयोजन करावे. याकरीता सर्व विभागांनी पुढाकार घ्या. दिव्यांग कक्षात त्यांच्या संबंधित योजना, मार्गदर्शन व त्यांच्या समस्यांचे निराकरण करा, असेही निर्देशही यावेळी दिले.

दर महिन्यात दिव्यांग लोकशाही दिनाचे आयोजन करुन त्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावा. दिव्यांगांना शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याकरीता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिव्यांगांना घरपोच मदत करा. तसेच दिव्यांगांना शहरी व तालुकास्तरावर शिबीराव्दारे युआयडी कार्ड तयार करुन द्यावे. सर्व यंत्रणांनी दिव्यांगांकरीता असलेल्या तीन टक्के आरक्षणाचा आढावा घेवून आरक्षणाचा लाभ द्यावा. सर्व विभागांनी दिव्यांगांच्या कल्याणाकरीता एका वर्षाचा आराखडा तयार करुन योजना राबवा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना