कोविडःआरटीपीसीआरमध्ये तीन तर रॅपिडमध्ये शुन्य पॉझिटिव्ह; चार डिस्चार्ज

 अकोला दि.4(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 152 अहवाल प्राप्त झाले. त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच खाजगी लॅब मधून शुन्य असे एकूण तीन आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर दिवसभरात चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.3) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65149(49150+15032+967) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 3 व खाजगी 0) 03 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य= एकूण पॉझिटीव्ह 03.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 368940 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 364825 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3705 नमुने होते. आजपर्यंत एकूण 368940 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 319790 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर तीन पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात तिघांचा  अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात तीन पुरुषांचा समावेश असून ते अकोला ग्रामीण क्षेत्रातील एक व मुर्तिजापूर येथील दोन रहिवाशी आहे. तर खाजगी लॅबच्या अहवालात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

चार जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

20 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65149(49150+15032+967) आहे. त्यात 1165 मृत झाले आहेत. तर 63964 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 20 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा