छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बाघेल यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

 




             अकोला दि.२८(जिमाका)- छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बाघेल यांचे आज दुपारी सव्वा १२ वाजेच्या सुमारास अकोला विमानतळ शिवणी येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश  अपार, तहसिलदार सुनिल पाटील आदी अधिकारी प्रशासनाच्या वतीने उपस्थित होते. तसेच रिसोड जि. वाशीमचे आमदार अमित झनक यांचीही यावेळी उपस्थिती होती.स्वागतानंतर श्री. बाघेल हे  पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शेगाव जि. बुलडाणाकडे रवाना झाले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ