कोविडःआरटीपीसीआरमध्ये दोन तर रॅपिड शुन्य पॉझिटिव्ह
अकोला दि.20(जिमाका)- आज दिवसभरात
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी
पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर)
124 अहवाल
प्राप्त झाले. त्यात दोघांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
दरम्यान काल (दि.19) रॅपिड
ॲटीजेन टेस्ट मध्ये
कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65176(49169+15035+972) झाली आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. दोन व खाजगी शून्य) दोन + रॅपिड
ॲन्टीजेन चाचणी 0= एकूण पॉझिटीव्ह 02.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 370425 नमुने तपासण्यात
आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 366318 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय
कर्मचाऱ्यांचे 3707 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 370425 अहवाल प्राप्त झाले
आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 321256 आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आरटीपीसीआर ‘दोन’
आज दिवसभरात आरटीपीसीआर
चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात दोघाचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरषांचा समावेश असून ते अकोला शहरातील रहिवासी
आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून
प्राप्त झाली.
पाच जणांवर उपचार
सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65176(49169+15035+972)आहे. त्यात 1165 मृत झाले
आहेत. तर 64006 जणांना डिस्चार्ज
देण्यात आला असून सद्यस्थितीत पाच जणांवर उपचार सुरु
आहेत, अशी माहिती
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन 136 चाचण्यांत
शून्य पॉझिटीव्ह
जिल्ह्यात काल (दि.11 रोजी)
रॅपिड ॲन्टीजेनच्या 136 चाचण्या राबविण्यात आल्या. त्यात एकाचाही
अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,असे जिल्हा रुग्णालयातून कळविण्यात आले आहे. अकोट
येथे एक, अकोला मनपा क्षेत्रात 119, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 16 अशा एकूण 136 जणांच्या
चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालयातून
कळविण्यात आले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा