जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थिनी निमंत्रित; ‘परीक्षा पे चर्चा’कार्यक्रमात पंतप्रधान साधणार संवाद ऑनलाईन सहभागाचे आवाहन

              अकोला दि.30(जिमाका)- येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या चार बालचित्रकार असलेल्या  विद्यार्थिनींना ‘परीक्षा पे चर्चा’ या  कार्यक्रमासाठी  निमंत्रण आले आहे. या कार्यक्रमाचे भेट प्रसारण होणार असून देशातील समस्त विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार दि. 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता थेट संवाद साधणार आहे.

‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रमात आपण आपले प्रश्न, मत व विचार https://drive.google.com/drive/u/1/folders/1eL6_3UqLtRnKM0gAmj5gSNQVVnLTJp52 या पोर्टलवर अपलोड करुन नोंदवू शकता. ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम दुरदर्शन व आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्या, शिक्षा मंत्रालयाचे अधिकृत यूट्युब चॅनलवर एकाच वेळी प्रसारित करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था, विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ