युक्रेनमध्ये शिकणारे जिल्ह्यातील पाचपैकी दोघे भारतात परतले; उर्वरित तिघेही सुरक्षीत
अकोला, दि.3(जिमाका)- शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असलेल्या अकोला जिल्ह्यातील मुळ
रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाच आहे. त्यापैकी दोघे दिल्ली येथे पोहोचले असून उर्वरित तिघे हे
विदेशात मात्र भारतीय दुतावासात सुरक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
यासंदर्भात जिल्हा
प्रशासनाने कळविलेल्या माहितीनुसार, मोहित विजय मालेकर व जॅक निक्सन हे
विद्यार्थी आज सकाळी दिल्ली येथे पोहचले आहे. तर उर्वरित हुसेनउल्ला
खान हा विद्यार्थी युक्रेनची सीमा पार
करुन रुमानिया मध्ये भारतीय दुतावासाने
निश्चित केलेल्या ठिकाणी मुक्कामी आहे.
प्राप्ती भालेराव ही विद्यार्थिनी युक्रेनची सीमा पार करुन स्लोहोकिया मध्ये सुरक्षित ठिकाणी असून भारतीय
दुतावासाच्या संपर्कात आहे. अब्दुस साबुर अहमद हा विद्यार्थी पोलंड येथील
भारतीय दुतावासामध्ये सुरक्षित ठिकाणी आहे,असे जिल्हा प्रशासनाने
कळविले आहे. या उर्वरित विद्यार्थ्यांना भारतात परत
आणण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरु आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा