कोविडःआरटीपीसीआरमध्ये शून्य पॉझिटिव्ह

अकोला दि.18(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 89  अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही असे, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.17) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65174(49167+15035+972) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. शून्य व खाजगी शून्य) शून्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0= एकूण पॉझिटीव्ह 00.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 370286 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 366169 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3707 नमुने होते. आजपर्यंत एकूण 370286 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 321119 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर ‘शून्य’  

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

12 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65174(49167+15035+972)आहे. त्यात 1165 मृत झाले आहेत. तर 63997  जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 12 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ