जागतिक महिला दिन - मंगळवारी(दि.8) महिला रोजगार मेळावा; दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

            अकोला, दि.5(जिमाका)- जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवार दि. 8 रोजी सकाळी दहा वा.  महिलांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनही सायंकाळी पाचेवाजेपर्यंत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे करण्यात आले आहे.  या मार्गदर्शन कार्यक्रम व मेळाव्याचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

            कार्यक्रम याप्रमाणे : सकाळी  10 वाजता महिला रोजगार मेळावा कार्यक्रम व प्रदर्शनद्घाटन या कार्यक्रमास जिल्हाधिकारी निमा अरोरा,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे मार्गदर्शन करतील. सकाळी 11 वाजता महिलांसाठी प्रशासकीय सेवेतील संधी व स्पर्धा परीक्षा याबाबत पोलीस उपअधीक्षक रितू खोकर, लेखाधिकारी रुपाली भुईभार मार्गदर्शन करतील तर मार्केटिग कौशल्य या विषयावर प्रशांत चौधरी, स्वप्निल गावंडे, बँकांची सुलभ कर्ज प्रक्रिया याविषयी कृषी  क्षेत्र अधिकारी पुनम देवाजे, आर्थिक साक्षरता याविषयावर मिनाक्षी तापडीया मार्गदर्शन करतील.

            दुपारी एक वाजता जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग योजनांची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक ‍निलेश निकम देतील. दुपारी दिड वाजता .संगिता भाकरे कायदेविषयक मार्गदर्शन करतील, दुपारी दोन वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सिमा तायडे या आरोग्य विषयक मार्गदर्शन करतील तर आहार विषयक मार्गदर्शन मनिषा वराडे व अंजली वाघ करतील. दुपारी चार वाजता ताणतणावापासून मुक्ती या विषयावर सचिन बुरघाटे मार्गदर्शन करतील. दुपारी साडेचार वाजता यशस्वी महिला उद्योजक स्नेहल ढवळे(ढवळे ॲटोमोबाईल) या उपस्थित महिलांशी संवाद साधतील. सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाचा समारोप होईल.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ