कलापथकांव्दारे आजपासून जनजागृती; पातूर व मुर्तिजापूर येथे दिली जनकल्याणकारी योजनांची माहिती



  

अकोला,दि. 9(जिमाका)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयमार्फत जिल्हा व तालुक्यास्तरावरील महत्वाच्या ठिकाणी कलापथकाव्दारे शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. जनजागृती मोहिम आजपासून सुरु झाली असून पातूर येथील नांदखेड व मुर्तिजापूर येथील तहसिल कार्यालय, बस स्थानक व गोरेगाव येथे शासनाच्या गेल्या दोन वर्षात राबविण्यात आलेल्या विविध लोक कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली.

 साने गुरुजी कला व सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ व सरस कला क्रीडा बहुउद्देशीय शिक्षण संस्थाच्या कलावंतांनी राज्य सरकारने दोन वर्षात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय, योजना व उपक्रमांची माहिती नागरीकांचे मनोरंजन करुन प्रबोधनातून दिली. यामध्ये शिवभोजन योजना, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशिय कृषी संकुल, जलजीवन मिशन, आरोग्यविषयक माहिती व स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग यासह अन्य योजना व उपक्रमांचा समावेश आहे. नांदखेड ता. पातूर व मुर्तिजापूर येथील नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.   

*******


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ