कोविडःआरटीपीसीआरमध्ये तीन पॉझिटिव्ह, सहा डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन शुन्य पॉझिटीव्ह


अकोला दि.6(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 116 अहवाल प्राप्त झाले. त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच खाजगी लॅब मधून शुन्य असे एकूण तीन आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर दिवसभरात सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.5) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65158(49156+15035+967) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 3 व खाजगी 0) 03 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0= एकूण पॉझिटीव्ह 03.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 369226 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 365111 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3705 नमुने होते. आजपर्यंत एकूण 369226 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 320070 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर तीन पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात तिघांचा  अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक स्त्री व दोन पुरुषांचा समावेश आहेत. त्यात अकोला शहरातील दोन व बार्शीटाकळी येथील एक प्रमाणे रहिवाशी आहे. तर खाजगी लॅबच्या अहवालात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सहा जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

16 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65158(49156+15035+967) आहे. त्यात 1165 मृत झाले आहेत. तर 63977 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 16 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ