प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तिच्या निर्मिती, वितरण व विक्रीस बंदी :केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनांची अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

              अकोला दि.30(जिमाका)-  पीओपीच्या वापरामुळे होणाऱ्या जल व वायु प्रदुषणाचा संभाव्य धोका लक्षात घेवून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने  मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच  पर्यावरण संरक्षण कायदा अधिनियम 1986 मधील तरतूदीनुसार प्लास्टर ऑफ पॅरिस मुर्तिचे उत्पादन, वितरण व विक्रीस शुक्रवार दि. 1 मे 2022 पासून प्रतिबंध  करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज  निर्गमित केले.

पर्यावरण संरक्षण कायदा अधिनियम 1986 मधील तरतूदीनुसार हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने  प्लास्टर ऑफ पॅरीस हद्दपार होण्याच्या दृष्टीने निर्गमित केलेल्या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी सन 2022 च्या गणेशोत्सवापासून करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आदेश याप्रमाणे :  

1.       अकोला जिल्ह्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसची (पीओपी) मुर्ती निर्मिती, वितरण, खरेदी व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

2.       2.       ज्या मुर्तिकारांकडे पीओपीच्या मुर्ति असतील त्यांना दि.30 एप्रिल 2022 पर्यंत विक्री करण्याची मुभा देण्यात येत आहे.

3.       पीओपीच्या मुर्ति बनविण्यास शुक्रवार दि. 1 मे 2022 पासून प्रतिबंध करण्यात येत आहे. यांनतर पीओपीच्या मुर्ती आढळून आल्यास मुर्ती जप्त करुन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. 

4.     येत्या गणेशोत्सवा दरम्यान पीओपी मुर्तिची विक्री करणाऱ्या तसेच खरेदी करणाऱ्या व्यक्तीवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने तसेच आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठान किंवा व्यक्तींवर दंडात्मक व कडक कारवाई करण्याकरीता मनपा आयुक्त व प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांनी विशेष पथक मोबाईल भराती पथकाची स्थापना करावी. तसेच गठीत पथकांमध्ये सेव्ह बर्ड संस्था, अकोला यांच्या प्रतिनिधींचा सुद्धा समावेश करावा. आदेशानुसार केलेल्या कार्यवाहीबाबतचा प्रगती अहवाल दर सोमवारी जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर करावा. तसेच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी फिरते भरारी पथकाकरीता पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती करावी, असे आदेशात म्हटले आहे.

 

           

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ