नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प; खारपाण क्षेत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन


        अकोला,दि. 9(जिमाका)- नाबार्ड कन्सल्टनसी सर्व्हिसेसमार्फत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पा अंतर्गत अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगांव, वर्धा, वाशिम व यवतमाळ खारपाण क्षेत्रात विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येते. या क्षेत्रातील अंमलबजावणी करतानाचे अनुभव, विविध समस्या व उपाययोजना या विषयावर बुधवार दि. 2 मार्च रोजी  शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.  

          अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकरी सदन सभागृह येथे चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात अंमलबजावणी यंत्रणेतील अधिकारी, विषय तज्ञ व शेतकरी मोठ्या संख्याने सहभागी झाले होते. चर्चासत्रात अमरावती विभागीय कृषि सहसंचालक के, एस, मुळे यांनी मार्गदर्शन केले. मृदा व जल संधारण तज्ञ (निवृत्त) डॉ. एस. एम. टाले यांनी खारपा जमिनीचे विविध गुणधर्म, जमिनीच्या विविध समस्या व उपाययोजना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मृदा व जल संधारण तज्ञ व संचालक डॉ. महेंद्र नागदिवे, डॉ.पं.दे.कृ.विद्यापीठचे विभाग प्रमुख डॉ. संजय भोयर यांनी मार्गदर्शन केले. तसेच मृदा व जल संधारण विभाग कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. किशोर घरडे यांनी चर्चेत सहभाग घेतला. तर जिल्हा कृषि अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, बुलडाणाचे डॉ. नरेंद्र नाईक यांनी अंमलबजावणी करतांना उद्भवलेल्या विविध समस्यांचे मांडणी केली.

 उपविभागीय कृषि अधिकारी अकोट, अकोला, तेल्हारा, खामगांव, बुलढाणा व अमरावती, जिल्हा अंमलबजावणी कक्ष पोकरा प्रकल्प, अमरावती, अकोला व बुलढाणा, तीनही जिल्ह्यातील मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, तसेच नाब्कॉन्सकडून संजय धानफुले, नाब्कोंस गटप्रमुख डॉ. के.यु. विस्वनाथन, कृषि अर्थशास्त्र तज्ञ, डॉ. सईद इस्माईल, कृषि अभियंता, आनंद ओझा, जलतज्ञ, एल.एस. रेड्डी, सामाजिक विषय तज्ञ, रविकिरण माळी, कृषि तज्ञ सिद्धार्थ भाटीया, नाब्कॉन्स तज्ञ राहुल हिवाळे ह्यांनी चर्चासत्रात भाग घेतला. तसेच शेतकऱ्यातर्फे अरविंद नळकांडे, जगन बगाडे, विजय लाजुरकर, भानुदासजी सपकाळ, सुभाष लाजुरकर, अभिजित मानकर, संजय आसरे, उत्तमराव सगणे, साहेबराव वाटाणे, गजानन गावंडे ह्यांनी चर्चा सत्रात आपले मत व्यक्त केले. चर्चासत्रात सर्वांशी चर्चा करून आगामी काळात करण्यात येणाऱ्या कामाविषयी आराखडा तयार करण्याचे आवाहन अमरावती विभागीय कृषि सहसंचालक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय धानफुले तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ भाटिया व रविकिरण माळी यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ