कॉपी प्रकरणी दोन शिक्षकावर निलंबनाची कार्यवाही

 


अकोला दि.24(जिमाका)-   जिल्ह्यामध्ये 10 वीची शालांत परिक्षा सुरु आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील परिक्षाकेंद्रावर गोपनीय भरारी पथकाव्दारे तपासणी करण्यात येत आहे. भारत विद्यालय, अकोला येथे गुरुवारी(दि.24) गणित विषयाचा पेपर भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षकांनी तोंडी उत्तरे सांगुन प्रश्नपत्रिकेवर तात्पुरते उत्तरे सांगितल्याचे निर्देशनास आल्यानंतर भारत विद्यालयातील दोन शिक्षकावर निलंबनाची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.  

जिल्ह्यामध्ये दहावीची शालांत परिक्षा सुरु आहे. परिक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी सुरु असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहे. प्राप्त तक्रारीनुसारी मनपा शिक्षणाधिकारी व त्यांच्या पथकाव्दारे परिक्षा केंद्रावर तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. त्यानुसार येथील भारत विद्यालय येथे परिक्षेदरम्यान भेट देऊन तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान एकूण 11 खोल्यांमध्ये 269 विद्यार्थी उपस्थित  होते. त्यापैकी खोली क्रमांक 302 मध्ये काही विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेवर पेन्सीलने लिहीलेले आढळून आले. त्याबाबत विद्यार्थ्यांची विचारणा केली असता गणिताच्या शिक्षकांनी तोंडी उत्तरे सांगून प्रश्नपत्रिकेवर तात्पुरते उत्तरे लिहण्याबाबत प्रवृत्त केल्याचे दिसून आले. यावेळी परिक्षा खोलीत पर्यवेक्षक सतिश सरकटे व  गणिताचे शिक्षक देवदत्त उपस्थित होते. तसेच सदर प्रकाराबाबत विद्यार्थ्यांना विचारणा केली असता विद्यार्थ्यांने कॉपी प्रकरणाची कबूली दिल्याने संबंधित विद्यार्थ्यांला मारहान झाल्याची तक्रार पालकांव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती.

प्राप्त तक्रार व तपासणी अहवालानुसार पर्यवेक्षक सतिश सरकटे व  गणिताचे शिक्षक देवदत्त दोषी आढळून आले असून हा प्रकार अतिशय गंभीर असून दोषी शिक्षकांना तात्काळ निलंबीत करण्याचे  शिफारस विभागीय परिक्षा मंडळाकडे केली आहे. तसेच यानंतर असे अनुसूचि प्रकार घडणार नाही यांची नोंद सर्व शाळा व महाविद्यालयानी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ