जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशवी निर्मिती, वितरण, खरेदी व विक्रीस बंदी

              अकोला दि.30(जिमाका)-  75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकच्या पिशव्यांमुळे निर्माण होणारा कचरा व प्रदुषण व पर्यावरणास होणारा धोका टाळण्यासाठी  75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची आयात, साठवणूक, निर्मिती, वितरण तसेच खरेदी विक्री यावर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज निर्गमित केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात दि.1 एप्रिल 2022 पासून करण्यात यावी,असेही आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी  तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था व प्रतिष्ठाने यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी  मनपा आयुक्त, उपप्रादेशीक अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी फिरते भरारी पथक तयार करावे. त्यात सेव्ह बर्ड संस्था अकोला या संस्थेच्या प्रतिनिधींचा समावेश करावा. पोलीस अधीक्षकांनीही स्वतंत्र फिरते भरारी पथक तयार करावे असे निर्देश देण्यात आले आहेत.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ