जागतिक महिला दिन; महिलांसाठी मंगळवारी(दि.8) रोजगार मेळावा


            अकोला, दि.4(जिमाका)- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार दि. 8 मार्च रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे करण्यात आले आहे.  या मेळाव्यात चार कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या मेळाव्याचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

            रोजगार मेळाव्यात अकोला येथील श्री. सॉप्ट टॉय, एमआयडीसी, लेबन लाईफ साईन्स प्रा.लि. एमआयडीसी, औरंगाबाद येथील धुत ट्रान्समिशन प्रा.लि. व भारतीय विमा निगम अकोला शाखा-1 या कंपनीमध्ये विविध 119 रिक्त पदांकरीता मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक महिलांनी  सहभागी होण्यासाठी https://akola.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करुन सहभाग नोंदवावा. तसेच अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र, अकोला किंवा दुरध्वनी क्रमांक 0724-2433849 येथे संपर्क साधावा, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त  यांनी दिली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ