मुख्य निवडणूक आयोगाचा उपक्रम; जागतिक महिला दिनानिमित्त अनुभव लेखन

अकोला दि.21(जिमाका)- भारत निवडणूक आयोगाने जागतिक महिला दिनानिमित्ताने स्त्री, पुरुष व तृतीय पंथी यांनी आपल्या जगण्यात लिंगभाव समता आणण्यासाठी केलेले प्रयत्न, संघर्ष, अनुभव या उपक्रमासाठी लिहून पाठवायचे आहे. याकरीता ‘अनुभव लेखन कशासाठी? लिंगभाव समतेसाठी’ या विषयावर अनुभव लेखन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होण्याकरीता 25 मार्चपर्यंत अनुभव किंवा लेख पाठवा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. अनुभव लेखन उपक्रमाअंतर्गत प्राप्त लेखाचे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या सविस्तर माहितीकरीता https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. 00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन